अकोला पूर्व आणि मुर्तीजापुर मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार सभेदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझी बॅग आणि हेलिकॉप्टर रोज तपासलं जातं. कायदा आहे.
निवडणुकीच्या दरम्यान उमेदवार किंवा मुख्य प्रचारक यांच्या बॅगा तपासल्या गेल्या पाहिजे. त्याप्रमाणे पोलीस विभाग त्याठिकाणी करत आहे. याबद्दल गैर काही मला वाटत नाही. काही जणांना वाटतं ते कायद्यापेक्षा मोठं आहेत. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.