विदर्भात अधिवेशन सुरू आहे मात्र विरोधी पक्ष कुठे दिसत नाही. विरोधी पक्ष सत्तेत विलीन झाल्याचे दिसत आहे. नागपूरमध्ये ८२ वेगवेगळे आंदोलन झाले आहे. यामध्ये केवळ केवळ कर्मचारी पेन्शन यावर चर्चा झाली आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी भाजपा यांनी २००० साली नवीन पेन्शन चा घाट घातला होता. तेव्हा जुन्या पेन्शनचा फंड शेअर बाजारात वापरण्याचा त्यांचा घाट होता. मात्र काही खासदारांनी जाणीवपूर्वक सांगितलं की मार्केट फंड गुंतवल्यास याची वैयक्तिक जबाबदारी फिक्स करावी, असे सांगितल्यामुळे ते थांबले. मार्च-एप्रिल मध्ये लोकसभा निवडणूक होतील. त्यामुळे जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्यांनी आग्रह करावा नाहीतर आचार संहितेच्या नावाखाली लागू करणार नाहीत. यासाठी कर्मचाऱ्यांनी पेन्शनचा मुद्दा लावून धरावा, असे म्हणाले.