मुंबईतील बीकेसीत इंडिया आघाडीची प्रचार सभा होणार आहे. सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खर्गेंसह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत जाहीर लोकसभेच्या पाचव्या टप्प्याची सांगता सभा पार पडणार आहे.
इंडिया आघाडीच्या, नेत्यांची मुंबईतील सहा लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी प्रतिष्ठापनाला लागलेली आहे. संपूर्णपणे सभास्थळाच्या ठिकाणी, तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे सुद्धा सभास्थळी येऊन पाहणी करत आहेत. यावेळी या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे.