उद्घाटनापासूनच सतत वादात असलेल्या समृ्द्धी महामार्गावरील ढिसाळ कारभार आता समोर आला आहे. समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील लोहोगाव पुलावर जीवघेणा खड्डा पडला आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या महामार्गावर भगदाड पडल्यानं कामावर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे. पुलावर मोठा खड्डा पडला आहे. त्यातील काँक्रीट भरभरून खाली कोसळले. सुदैवाने या ठिकाणी आतापर्यंत अपघात झाला नाही. लोहगावनजीक एक कि.मी. लांबीचा पूल आहे. पुलावरील काँक्रीट खाली कोसळताना शेतकऱ्यांना दिसले. सध्या या ठिकाणी खड्डा दुरुस्तीचं काम सुरू आहे, तर उद्या सायंकाळपर्यंत हे काम दुरुस्ती होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.