मनोरमा खेडकरला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पिस्तूल रोखल्याप्रकरणी मनोरमांना अटक करण्यात आली आहे. पौड दिवाणी न्यायालयानं सुनावली कोठडी सुनावली आहे. मनोरमांना रायगडच्या हिरकणीवाडीतून अटक ताब्यात घेण्यात आलं आहे. नाव बदलून एका हॉटेलमध्ये त्या वास्तव्य करत होत्या.
मनोरमा खेडकर यांच्या बंदोबस्तासाठी पुणे ग्रामीणच्या मुख्यालयातून महिला पोलिसांची कुमक तैनात असणार आहे. शेतकऱ्याला पिस्तूल दाखवत धमकावून धमकवल्याप्रकरणी पौड पोलिसांत मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर आता त्यांना 20 तारखेपर्यंत पौडच्या महिला कस्टडीत राहावं लागणार आहे.