व्हिडिओ

PM नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरीपुरस्कार प्रदान

पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्वहस्ते हा पुरस्कार देऊन मोदींचा गौरव केला.

Published by : Dhanshree Shintre

पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्वहस्ते हा पुरस्कार देऊन मोदींचा गौरव केला. मोदींना द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलेला आहे. मोदींकडून रशियाचा सर्वकालीन मित्र असा उल्लेख यावेळी करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 16 देशांनी पंतप्रधान मोदींचा सन्मान केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान रशियाकडून मोदींचा सन्मान करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. हा सन्मान 2019 मध्ये घोषित करण्यात आला होता. रशियानंतर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवाद, परस्पर सहकार्य आणि शांतता प्रस्थापित करण्यावर चर्चा झाली. याआधी भूतान, इजिप्त आणि फ्रान्ससह अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले आहे.

महायुतीच्या नेत्याची दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

दहावीच्या परीक्षेत मोठा बदल; 'या' दोन विषयात 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी होणार पास

Cyclone Dana : दाना चक्रीवादळ उद्या पहाटे पश्चिम बंगाल, ओडिसाच्या किनारपट्टीला धडकणार

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Special Report | Eknath Khadse | CM Eknath Shinde | शिंदेंच्या टार्गेटवर खडसेंचा बालेकिल्ला