मुंबईत आजपासून प्लॅस्टिक पिशवी बंद असेल. पर्यावरण रक्षणासाठी पालिका आजपासून प्लॅस्टिक पिशवीबंदीची धडक कारवाई सुरू करणार आहे. कारवाईदरम्यान 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्यास पाच हजारांचा दंड आकारला जाणार. तर ग्राहकांकडे अशी पिशवी आढळल्यास प्रबोधन करून कारवाईचा इशारा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. आजपासून मुंबईमध्ये प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुंबई महापालिका करणार धडक कारवाई करतेय. कारवाई पथकात एका पोलीस अधिकाऱ्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अधिकारी आणि पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश असून भरारी पथकाकडून दुकानदार, फेरीवाले आणि मॉलमध्ये कारवाई केली जाणार आहे.