कारवर हल्ला करणाऱ्याच्या पदाधिकाऱ्याचा मिटकरींसोबत फोटो समोर आलेला आहे. ज्या पदाधिकाऱ्याने मिटकऱ्यांच्या कारवर हल्ला केला होता त्याचा फोटो मिटकरींसोबत समोर आला आहे. त्यामुळे चर्चेला उधान आलं आहे. अमोल मिटकरी आणि पंकज साबळे यांचा एकत्रित फोटो समोर आलेला आहे.
तर दोघांचा एकत्र फोटो समोर आल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. पंकज साबळेंचा मिटकरींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सुद्धा हजेरी पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता चर्चा पाहायला मिळत आहे. पंकज साबळे मनसैनिक आहेत, मनसेचे पदाधिकारी आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यावर मिटकरी यांच्या कारवर हल्ला केला होता. आता तेच पंकज साबळे हसत मुखानं मिटकरांच्या वाढदिवसाला सामिल झाल्याचं दिसतं.