50 टक्क्यांवरु 75 टक्के आरक्षण जाऊ द्या, असं केल्यास ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्यांनाही मिळेल व वाद कमी होतील अशी मागणी शरद पवार यांनी केली होती. आता याच मागणीवर देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना सवाल केला आहे.
मराठा आंदोलकांच्या मागणीला पवारांचं समर्थन नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. मराठी आंदोलकांनी केलेली मागणी आणि पवार साहेबांनी केलेली मागणी ही वेगळी आहे असं फडणवीस म्हणाले आहेत.