छत्रपती संभाजी नगर शहरालगत असलेल्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये जुपिटर तात्राव्यागोंका ही कंपनी 100 कोटीची गुंतवणूक करनार असून या कंपनीत रेल्वेला लागणाऱ्या पार्टचे उत्पादन केले जाणार आहे. तर सोबतच वंदे भारत ट्रेनला लागणारे पार्टसुद्धा येथेच बनवण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे 200 बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक विवेक लोहिया यांनी दिली.
भारतात रेल्वेच जाळ सर्वत्र पसरल असून रेल्वेच्या चाकांची मागणी जास्त होत आहे. त्यानुसार उत्पादनाला प्राधान्य दिले जाणार असून शेंद्रा औद्योगिक वसाहतीत कंपनी गुंतवणूक करणार आहे. यामुळे व्हील सेट उत्पादनाला चालना मिळणार असून वंदे भारत रेल्वे साठी लागणाऱ्या पार्टची मागणी देखील पूर्ण करता येईल.