विधानसभा निवडणुकीच्या निकलानंतर आता प्रविण दरेकर यांचा मविआवर हल्लाबोल पाहायला मिळत आहे. पराभव स्वीकारा, रडीचा डाव खेळू नका असं म्हणत दरेकरांनी मविआवर निशाणा साधला आहे. तर पुढे प्रविण दरेकर म्हणाले की, शरद पवारांचे किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे 20 आमदार आले त्याच्यामुळे मला असं वाटत रडीचा डाव खेळू नका आणि मोठ्या मनाने पराभव स्वीकारा.
विजय पराजय लोकशाहीत होत असतात. अशाप्रकारे रडीचा डाव खेळण योग्य नाही. यामध्ये महायुतीकडून करण्यात आलेलं मायक्रो मॅनेजडमेन्ट, मत वाढवण्यासाठी करण्यात आलेले समाज योजना, सामाजिक बैठका, सामाजिक कार्य असतील यांचा उपयोग मत वाढण्यात आम्हाला झाला.
जो-तो आपल्या कर्माने आणि कृतीन संपत असतो, मविआला टोला- प्रविण दरेकर
मला वाटत त्यांना आत्मपरिक्षणाची गरज आहे. कोणी कोणाला संपवत नसतो, जो-तो आपल्या कर्माने आणि कृतीन संपत असतो. पक्षाला अपयश आलं म्हणजे कोणी संपल असं काही मानायचं कारण नाही. त्यांनी पुन्हा मेहनत घ्यावी, पुन्हा पक्ष उभा करावा. आमच्या पक्षाने देखील महाराष्ट्रात अपयश बघितलं आहे. आम्ही खचून न जाता काम केलं. काम करा फक्त फेसबुक लाईव्ह केलं तर जनता स्वीकारत नाही.