परळीचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) या विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार (महायुती) धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील गणेश मंदिर परिसरात काल (17 नोव्हेबर) प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाजपा सरचिटणीस व विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे यांनी या प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, “खासदार व्हायला गेले आणि आमदार झाले, तुमचीच नजर लागली, असं वाटतंय. मी दिल्लीला गेल्यावर इथे लक्ष देणार नाही, असं सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळेच असं झालं' असं मिश्किल वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.