पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 76 हजार 200 कोटींच्या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे बारामाही बंदराची उभारणी नव्याने करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली आहे.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.