तुळजाभवानी मंदिराततील मुख्य शिखरासह परिसरात रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. शारदीय नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने मंदिर संस्थांकडून मोठी तयारी करण्यात येत आहे. उद्यापासून तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. याच अनुषंगाने मंदिरात मोठी तयारी करण्यात येत असून देवीच्या मुख्य शिखरासह परिसरात रंगरंगोटी करण्यात आलेली आहे.
नवरात्रोत्सव काळात ज्या वाहनांवरून देवीचा छबिना निघतो त्या वाहनांची देखील रंगरंगोटी करण्यात आली आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नारळ फोडणे, तेल विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानी हा निर्णय घेतला आहे. 3 ते 18 ऑक्टोबरदरम्यान नियम लागू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.