छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी अवघे 500 रुपये अनुदान दिले जात आहे. किल्ले सिंधुदुर्गावर श्री शिवराजेश्वर मंदिर आहे. मंदिरासाठी महिना 500 रुपये भत्ता दिलेला जातोय. शिवाजी महाराजांच्या नावे सरकार चालवणाऱ्यांचा हात आखडता? असा प्रश्न निर्माण होतोय. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही अंमलबजावणी केली गेली नाही. शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी अवघे 6 हजार रुपये वर्षाला दिले जात आहेत. अब्जावधींचा खर्च करणाऱ्या सरकारचा हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी आखडता का? असा प्रश्न निर्माण होतोय.