पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात आणखी एक अटक झालेली आहे. पश्चिम बंगालमधून सुनील बर्मन या आरोपीला अटक करणात आली आहे. दोन दिवसांपूर्वी सुनील बर्मन याला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काल बर्मन याला स्थानिक न्यायालयात हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे.
पुढील तपासासाठी बर्मन याला पश्चिम बंगालमधून पुण्यात आणण्यात येत आहे. विश्रांतवाडी येथील गोदामावर पोलिसांनी छापा टाकून ५५ किलो ड्रग्ज जप्त केले होते. संबंधित गोदामबाबतचा भाडेकरार हा सुनील बर्मन यांच्या नावावर होता.