एमआयएमचे माजी खासदार 'इम्तियाझ जलील यांना अटक करा' शंभुभक्तांच्या मागणीला भाजप नेते नितेश राणेंचा पाठिंबा दिला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष सहन करणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
तर पुढे नितेश राणे म्हणाले, आमच्या छत्रपती संभाजी राज्यांनी इस्लाम स्विकारला नाही धर्मांतर केली नाही याचा राग या पिल्लावरांच्या मनात आहे. म्हणूनच तिरंगा यात्राच्या नावाने छत्रपती संभाजी महाराजांवर यांचा द्वेष यानिमित्ताने दिसून आला. आज राज्यभर शिवशंभुभक्त संभाजी राजांचे मावळे हे सगळीकडे ठिय्या आंदोलन करत आहेत. त्याता हा इम्तियाझ जलील नावाचा हिरवा साप याला लवकरात लवकर तुम्ही अटक करा अशी मागणी आमचे सर्व शिवशंभुभक्त करत आहेत.