महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल उद्या लागणार आहे, आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उमेदवारांची धाकधूक वाढली आहे, कारण मतदारांनी कोणाच्या पारड्यात मताचं दान टाकलं हे 23 नोव्हेंबरला समजणार असलं तरी, एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.
कोकणातील राजकीय लढाईचं चित्र एक्झिट पोलमध्ये स्पष्ट होतं आहे, ज्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत. यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून, उद्धव ठाकरे आणि त्याच्या पक्षावर हल्लाबोल केला आहे
ते म्हणाले की, जनतेने आम्हाला भरभरुन प्रतिसाद दिलाय. कामाच्या आधारावर आम्ही मतं मागितली होती. जनतेने सरकारची विकासकामं पाहिली आहेत. टीका करुन विकास होत नाही, कामही करावं लागतं.
आम्ही उद्धव ठाकरेंना सिरियसली घेत नाही. उबाठावाले स्वत: काही काम करत नाहीत. प्रकल्प कसा घालवायचा हेच उबाठांना जमतं. हे फक्त विरोध करु शकतात, माथी भडकवू शकतात. 'नुसते प्रकल्प रदद् करण्यापेक्षा कोकणासाठी काहीतरी करा. 'कोकणाच्या विकासाला विरोध आणखी किती दिवस चालणार?' आमच्या प्रकल्पांना विरोध करता, मग तुम्ही काहीतरी आणा अस म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.