नवीन वर्षाची सुरुवात साईंच्या दर्शनाने करण्यासाठी देश विदेशातील साईभक्त साईबाबांच्या दरबारी दाखल झाले आहे. शिर्डीत लाखोच्या संख्येने भाविक आले आहेत. सकाळपासून भविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. भविकांनी साईनगरी फुलून गेली आहे. आज 31 डिसेंबर असल्याने प्रत्येक भविकांचं दर्शन व्हावं यासाठी रात्रभर साई समाधी मंदिर खुलं राहणार आहे. रात्री 12 वाजता साई मंदिर मध्ये जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. साई संस्थानकडून चोख नियोजन करण्यात आलं आहे.