Amol Mitkari  Team Lokshahi
व्हिडिओ

विधान भवन परिसरात "शाईच्या पेनाला" बंदी मात्र; मिटकरींनी शेअर केला पुन्हा एक व्हिडिओ

विधान भवन परिसरातील आणखी एक पराक्रम.. ( माहितीसाठी). गरमागरम हिवाळी अधिवेशन

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत. त्यातच नागपूरमध्ये शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र, हे अधिवेशन मोठे वादळी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवासातील व्हिडिओ ट्वीट केला होता. यात एक वेटर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी वापरत असल्याचा दिसून येत होते. त्यानंतर या प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले होते. यावरच आता मिटकरी यांनी पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

यावेळी त्यांनी सिगरेट ओढताना एका नागरिकाचा व्हिडिओ टाकला आहे. त्याठिकाणी धूम्रपान करू नये असे लिहलेले असताना देखील एक व्यक्ती विधानभवनाच्या आवारात सिगरेट ओढत आहे. हा व्हिडिओ ट्विटवर टाकत मिटकरी म्हणाले की, विधान भवन परिसरात "शाईच्या पेनाला" बंदी मात्र सिगारेट ओढायला खुली परवानगी . विधान भवन परिसरातील आणखी एक पराक्रम.. ( माहितीसाठी).#गरमागरमहिवाळी अधिवेशन असे ते यावेळी म्हणाले आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news