राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री कोण होणार यावर प्रश्नचिन्ह आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावरून सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं आहे. राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. शरद पवारांकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. अजितदादांनी घड्याळ चिन्ह वापरुन भ्रम निर्माण केला. मतदारांमध्ये भ्रम निर्माण केल्याचा शरद पवारांनी आरोप केला आहे. पुरावे म्हणून काही कागदपत्रं दाखल करण्यास परवानगी द्या अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मागणी केली आहे.