महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद डेअरी गुजरातमधून चालवली जाणार आहे. महानंदच्या संचालक मंडळानं एनडीडीबीच्या व्यवस्थापनाला हा प्रकल्प चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल डेअर डेव्हलपमेंट बोर्ड महानंद चालवणार असून त्यांचं मुख्यालय गुजरातच्या आणंदमध्ये आहे. राज्य सरकारनं या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर एनडीडीबीच्या व्यवस्थापनाकडं महानंदचे अधिकार जाणार आहेत. एनडीडीबी ला महानंद देण्याऐवजी राज्यातील सक्षम सहकारी दूध संघास महानंदा चालवण्यास देण्यात यावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.