गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील पेसा भरतीच्या मागणीसाठीचं उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलेलं आहे. नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाचा प्रवेशद्वारावर उपोषणास बसलेले माजी आमदार जे.पी गावित यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
पंधरा दिवसांत मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलेला आहे. तर संपूर्ण आदिवासी पट्ट्यातील आदिवासी बांधव हे पंधरा दिवसानंतर निर्णय न आल्यास चक्काजाम करतील असे देखील जे पी गावित यांनी सांगितले आहे. आदिवासी नेते जे.पी.गावित यांच्याकडून सरकारला असा इशारा देण्यात आलेला आहे.