नाशिक: महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शहर वाहतूक बस सेवेच्या वाहकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या महिन्यात 18 आणि 19 जुलै रोजी वाहकांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी संप पुकारला होता. यावेळी 30 जुलैपर्यंत थकीत असलेले वेतन देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ऑगस्ट उजाडला तरीही पगार न झाल्याने वाहकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात वाहकांचा थकीत पगाराच्या संदर्भातला हा चौथा बेमुदत संप आहे. या संपाचा नाशिकरांना प्रचंड फटका बसणार आहे.