अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या नरेश अरोरा यांना काही प्रश्न विचारण्यासाठी मी ट्विट केलं होतं मात्र माझ्या काही सहकाऱ्यांनी मला ते डिलीट करायला लावलं होत. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडल वरील ट्विट मधील कंटेंट हे नरेश अरोरा यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी काय घरी बसायचं काम केलं का असा सवालही मिटकरी यांनी अरोरा यांना विचारला आहे. तुम्ही यशाचे श्रेय घ्या तुमच्यासारख्या पाच पीआर एजन्सी या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. मात्र त्यामधील कुणीही भांडवल केलं नाही आणि कुणीही त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत केली नाही. असा टोलाही मिटकरी यांनी लगावला आहे. तर अजित पवार यांच्यावर खांद्यावर हात ठेवणे म्हणजे कार्यकर्त्यांचा अपमान आहे त्यामुळे मी निषेध नोंदवतो असं मिटकरी यांनी म्हटलं आहे. तर नरेश अरोरा यांनी माफी मागावी असं देखील मिटकरी म्हणाले.