पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ते 21 नोव्हेंबर दरम्यान नायजेरिया, ब्राझील आणि गयाना दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा भारतासाठी धोरणात्मक आणि राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. ही भेट म्हणजे दोन खंडातील तीन प्रमुख देशांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याची महत्त्वाची संधी आहे. या भेटीमुळे महत्त्वाच्या जागतिक भागीदारांसोबत राजनैतिक आणि आर्थिक संबंध मजबूत होण्यास मदत होईल. पंतप्रधान मोदी 16 नोव्हेंबरला नायजेरियाला पोहोचतील, जिथे ते नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांची भेट घेतील. 17 वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांची नायजेरियाला ही पहिली भेट असेल आणि अशा वेळी आली आहे जेव्हा भारत आणि नायजेरिया 2007 मध्ये स्थापन झालेल्या त्यांच्या धोरणात्मक भागीदारीचा उत्सव साजरा करतंय.