नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आम्हाला शिवद्रोही म्हणणारे उद्धव ठाकरे कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर बाळासाहेब ठाकरे स्वाभिमानी होते पण उद्धव ठाकरे हा स्वार्थी माणूस आहे. असंही नारायण राणे म्हणाले.
शरद पवारांनी सत्तेत असताना आरक्षण का दिलं नाही? असा सवाल राणेंनी केला आहे. पवारांनी शांततेत मोर्चे काढून संदेश दिला पाहिजे असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे. तर पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद असल्याचं नारायण राणे म्हणाले. पवार काडी आणि पेट्रोल घेऊन तयार असतात असाही हल्लाबोल राणेंनी केला आहे.