परिवहन विभागाने शहादा शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन दर्जेदार बस स्थानक तयार करण्यात आलेलं आहे. मात्र हे बस स्थानक धुळखात पडलं आहे. महामंडळाचे या बस स्थानकावर कुठलेही कामकाज होत नाही आहे. तर बसेस देखील या ठिकाणी येत नसल्याने शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले नवीन बस स्थानक काय उपयोगाचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी नवीन बस स्थानक तयार करण्यात आलेला आहे. मात्र काही व्यापाऱ्यांच्या तक्रारीमुळे नवीन बस स्थानकात स्थलांतर होत नाही आहे. मात्र प्रवाशांच्या हिताच्या विचार करून नवीन बस स्थानक सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.