नंदुरबार जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ठिकाणी जीएसटी च्या वतीने छापेमारी करत तपासणी करण्यात येत आहे. बांधकाम साहित्याशी संबंधित असलेल्या व्यापारी प्रतिष्ठान वर जीएसटी विभागाच्या वतीने अचानक तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नंदुरबार अक्कलकुवा खांडबारा आणि इतर ठिकाणी ही तपासणी सुरू असून यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सध्या तरी बोलण्यास नकार दिलाय. एकाच वेळी जीएसटी ची तपासणी होत असल्याने व्यवसायिक आणि व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.