नाना पटोले म्हणाले की, राज्यात आणि देशामध्ये हे शिवद्रोही सरकार आलेलं आहे. महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि महाराजांचा अपमान करायचा तसेच कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करण्याचं पाप हे महाराष्ट्राच्या सरकारने केलं आहे. महाराजांचा जो पुतळा कोसळला तो केवळ महाराजांचा पुतळा नसून महाराष्ट्राचा मान होता आणि तुम्ही त्याच्या अवमान केलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये जे शिवप्रेमी आहेत ते महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात हुतात्मचौकापासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्क होण्यासाठी इथे आलो आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि खासदार शाहू महाराज हे शिवद्रोही सरकारच्या विरोधात निषेध करण्यासाठी याठिकाणी आले आहेत.
ज्यावेळी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावेळी आम्ही आणि या महाराष्ट्राच्या जनतेने महाराजांची माफी मागितली की, आम्ही चुकून या शिवद्रोही सरकारला सत्तेत येऊन दिलं खोट्याचं सरकार राज्यात आलं. त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला म्हणून आम्ही महाराजांची माफी मागून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं शिवद्रोही सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही अशी शप्पत आम्ही घेतलेली आहे.