25 महिलांशी लग्न करुन फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नालासोपारा पोलिसांकडून अटक या आरोपिला अटक करण्यात आली आहे. फिरोज नियाज शेख असं या आरोपीच नाव आहे. नालासोपाऱ्यातील महिलेच्या तक्रारीवरून हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. महिलांना फसवणाऱ्या लखोबा लोखंडे आता अटक करण्यात आली आहे.
फिरोज शेखने पुणे, मुंबई, वसई, विरार, उत्तर प्रदेश, गुजरात यासह अन्य राज्यातील महिलांची फसवणूक केली आहे. तसेच त्याने पुण्यात 4 महिलांसोबत लग्न केल्याचं उघडकीस आलं आहे. आरोपीने 7 वर्ष तुरुंगवास देखील भोगल्याचं समोर आलं आहे. शादी डॉट कॉम या संकेत स्थळावरील विधवा महिलांना हेरून त्यांच्यासोबत ओळख वाढवून त्यांना लग्नाच्या बेडीत अडकवून त्यानंतर काही तरी बहाना देऊन त्या महिलांची लाखोंची फसवणूक करून हा आरोपी फरार होत होता.