नागपूर : मागच्या वर्षी आधार कार्ड बघून आयोजकांनी गरब्यामध्ये प्रवेश दिला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला होता. यावर्षी एक पाऊल पुढे टाकत विश्व हिंदू परिषदेने नवीन फरर्मान काढले आहे. गरब्यामध्ये प्रवेश देताना आधार कार्ड बघावे. हातावरती रक्षा सूत्र बांधावे आणि गोमूत्र देखील प्यायला द्यावे. नंतरच प्रवेश द्यावा. पण जे गैर हिंदू आहेत त्यांना जर गरब्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांना आधी घर वापसी करावी लागेल, असाही फर्मान विश्व हिंदू परिषदेने काढलेला आहे.