नागपुरमध्ये सुनील केदारांच्या विरोधात भाजप पक्ष आंदोलन करणार आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी भाजप आक्रमक झालं आहे. तर भाजपचे नेते आशिष देशमुखांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन केलं जाईल तर रामटेक येथिल उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपचा मोर्चा निघणार आहे.
यावर भाजपचे नेते आशिष देशमुख म्हणाले, मागच्या महिन्याच्या 2 तारखेला आम्ही जिल्हा सहकारी बँकेच्या पिडित शेतकरी आणि पिडित खातेदारांच्या वतीनं ठिय्या आंदोलन केलं होत. 1444 रुपये सुनील केदारांकडून ते वसूल करून या सर्व खातेदारांना आणि शेतकऱ्यांना वितरण करून द्यावे या संदर्भाच्या तांत्रीक अडचणींचा मुद्दा वळसे पाटलांकडून ऑर्डर देऊन मार्गी लावावा.
महिना झाला तरी अजून काही होत नसल्यामुळे मोठा असा बेधडक मोर्चा आम्ही रामटेक येथिल उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काढत आहोत. त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने वळसे पाटील हे जूने पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले सुनील केदारांच्या दबावाखाली धिरंगाई करत आहेत अशी जी शेतकऱ्यांच्या मनात भावना आहे ती दूर होण्यासाठी वळसे पाटीलांनी तातकाळ या संदर्भात ऑर्डर द्यावी ही त्यांना विनंती आहे.