राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आज मविआचा सद्भावना दिवस संकल्प मेळावा होत आहे. षण्मुखानंद या सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार तसेच मल्लीकार्जुन खरगे हे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तर मेळाव्या आधी मुंबईमध्ये मविआच्या स्थानिक नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार आहे याकडे लक्ष लागलेलं आहे.
तर कॉंग्रेसचे दिल्लीमधील नेते आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि याठिकाणी मविआचा हा मेळावा होत आहे. त्यादरम्यान काय चर्चा होणार आणि काय कानमंत्र या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना दिला जातो ते ही बघावं लागणार आहे. कारण, काही दिवसांवर विधानसभेची निवडणुक आहे, एकीकडे सत्ताधारी महायुतीकडून लोकोपयोगी लोकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. लोकसभेमध्ये जरी मविआला चांगले यश आले असले तरी आता विधानसभेची वाट तेवढी सोपी दिसतं नाही आहे.