मुलुंड मध्ये मराठी महिलेस कार्यालयाची जागा नाकारल्यानंतर आता प्रशासन सतर्क झाले आहे. मुलुंड उपनिबंधक कार्यालयाकडून सर्व गृहनिर्माण सोसायट्याना नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.
मुलुंड उपनिबंधक कार्यालयाने मुलुंडमधील सर्व गृहनिर्माण सोसायटी यांना नोटीस बजावत जर एखाद्या ग्राहकास जात धर्म, वंश, भाषा यावरून सदनिका नाकारल्यास त्याची जबाबदारी ही व्यवस्थापकीय मंडळाची असल्याचे निर्देश दिले आहेत.
जर असे प्रकार आढळले तर संबंधित गृहनिर्माण संस्थेवर कार्यवाही करण्याचा इशारा देखील उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आलेला आहे. ईशान्य मुंबई खासदार मनोज कोटक यांनी मुलुंडमध्ये मराठी महिलेला फ्लॅट नाकारल्याच्या प्रकरणानंतर उपनिबंधक कार्यालयाला पत्र लिहिलं होतं. त्यानंतर सदर पत्राला प्रतिसाद देत उपनिबंधक कार्यालयाकडून सर्व गृहनिर्माण सोसायटी यांना सर्क्युलर जारी करण्यात आले आहे.