मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. याबाबत महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे मेट्रोच्या दोन्ही मार्गी अतिरिक्त 24 फेऱ्या होणार आहेत.
'दहिसर - अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ' आणि 'दहिसर - गुंदवली मेट्रो ७' मार्गिकांवरील मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या दोन्ही मार्गिकांवर मेट्रोच्या अतिरिक्त २४ फेऱ्या होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.