मराठी पाट्यांसाठी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. मुंबईतील तब्बल सात लाख दुकानं मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत. शनिवारनंतर पालिकेकडून धकड कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. दुसरीकडे दुकानावर मराठी पाट्या लावा नाही तर दंड भरावा लागणार आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत दुकानांवरील पाट्या मराठीत लावल्या नाहीत तर प्रतिकामगार 2 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे, असा मनसेही इशारा दिला आहे.