रायगड: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पावसाळ्यात मोठी दुरावस्था झाली आहे. जागोजागी मोठ मोठे खड्डे पडल्याने प्रवास जीवघेणा बनला आहे. अनेक आंदोलने निदर्शने झाल्यानंतर ही तिच अवस्था राहिल्याने रायगड मधील व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या श्रेयस केकान याने भल्यामोठ्या खड्ड्यात उतरून रिल तयार करून सोशल माध्यमातून सरकारचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. श्रेयस यांच्या अनोख्या रिलला नेटकऱ्यांनी देखील जोरदार प्रतिसाद दिला आहे.