भाजप नेते यांनी राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आज मुंबई कॉंग्रेसतर्फे आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. मुंबईतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावर वर्षा गायकवाड म्हणाल्या, ज्या तरेने राहूल गांधी यांना धमकी देण्यात आलेली आहे. खरं तर राहूल गांधी यांनी आम्हाला शिकवलं आहे "घबरायचं नाही लढायचं" आणि आम्ही लढण्याचं काम करणार. ज्याप्रकारे राहूल गांधी यांना धमकी देण्यात आली तुमच्या गादी सारख तुम्हाला उडवण्यात येईल आणि ही धमकी कोणाला देण्यात आली राहूल गांधींना जे भारत जोडो यात्रेतून सामान्य जनतेमध्ये सामील झाले. माझा प्रश्न असा आहे की, जे संसदेमध्ये प्रतिपक्षनेता आणि विरोधीपक्ष नेत्याचं काम करतं आहेत.
अशा माणसाला भाजपच्या प्लॅटफॉर्मवरून धमकी दिल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी काय कारवाई केली त्यांच्यावर? त्यांना जेलमध्ये तरी टाकलं का? त्यांच्यावर पक्षाच्या वतीनं काय कारवाई झाली का? काहीचं झालेलं नाही आहे आणि म्हणून आमच हे आंदोलन सुरु आहे आणि जोपर्यंत त्यांना जेलमध्ये टाकत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरुच राहणार आहे.