अटल सेतूला तडे जाण्याच्या प्रकरणामध्ये प्राथमिक अंदाजानुसार परिसरात सुरु असलेले दगड फोडण्याचे काम कारणीभूत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर तज्ञांचा अहवाल येईपर्यंत हे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. MMRDA आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून तज्ञांनचा अहवाल दोन महिन्यात सादर केला जाणार आहे. तर अटल सेतूचं काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालं आहे.
नुकताच हा सेतू मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असताना काही महिन्यांमध्ये या सेतूला तडे जाण्याचा प्रकरण समोर आला होता आणि या सेतूला तडे गेले होते. तर त्याचे कारण समोर येताना दिसत आहे, प्राथमिक अंदाजानुसार परिसरात दगड फोडण्याचे काम सुरु आहे आणि त्यामुळेच या अटल सेतूला तडे जात असल्याचं बोललं जात आहे.