श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादावर उंदराची पिल्ले सापडल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मात्र हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील नसून हिंदू देवतांचा अपमान करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला जात असल्याचा खुलासा मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांनी केला आहे. सिद्धिविनायक मंदिराचा प्रसाद नेमका कसा तयार होतो, याचा आढावा थेट सिद्धिविनायकाचा प्रसाद तयार होणाऱ्या प्रसादालयातून घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील लाडूंच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे 50 हजार लाडू बनवले जातात. प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी 50 ग्रॅमचे दोन लाडू असतात. सणासुदीच्या काळात प्रसादाची मागणी वाढते. भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यापूर्वी अन्न व औषध विभागाचे अधिकारी नियमितपणे या लाडूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांची तपासणी करून ते सर्टिफाइड करतात.