व्हिडिओ

Monkeypox : आरोग्य विभागाकडून मंकीपॉक्सचा प्रसार टाळण्यासाठी देशात हायअलर्ट जारी

Published by : Siddhi Naringrekar

मंकीपॉक्स झपाट्याने पसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून मंकीपॉक्सचा प्रसार टाळण्यासाठी देशात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

यासोबतच प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरुकतेसाठी उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी देशात हायअलर्ट जारी केला असल्याची माहिती मिळत आहे.

सर्व राज्यांना मंकीपॉक्सबाबत उपायोजना करण्याचे आदेश देण्यात आले असून जनतेमध्ये दहशत निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच उपाययोजनांबाबत अहवाल सादर करण्याचे आरोग्य विभागाने आदेश दिले आहेत.

Beed : बीड जिल्ह्यातील मांजरा धरण 100 टक्के भरले

Satara : सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ

पुणे हिट अँड रन प्रकरण; अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल न्याय मंडळात पोलिसांकडून अहवाल सादर

Amit Shah : केंद्रीय मंत्री अमित शाह 'या' दिवशी येणार मुंबई दौऱ्यावर

Sharad Pawar : आज पुण्यात शरद पवारांची सभा