व्हिडिओ

Beed: बीडमधील मोबाईल कॉपी प्रकरण, Lok शाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट

Published by : Team Lokshahi

बीडच्या परळीतील नागनाथ अप्पा हलगे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. या महाविद्यालयात विद्यार्थी खुलेआम मोबाईल आणि नोट्सच्या माध्यमातून कॉपी करताना आढळून आले होते. आणि याचाच व्हिडिओ सोशल माध्यमावर वायरल झाला होता. दरम्यान याचीच दखल घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द केले आहे. तसेच बीई सिव्हिल अंतिम वर्षाचा संबंधित पेपरही रद्द करण्यात आला आहे. तर प्राचार्य समन्वयकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चार महाविद्यालयातील 79 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे.

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...