महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली दौरा केल्यापासून मनसे महायुतीत सामील होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. परंतु, याबाबत अधिकृत घोषणा न झाल्याने राजकीय समीकरणांबाबत सस्पेन्स कायम आहे. अशातच मनसेनं दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेची मागणी केलीय. परंतु, ही दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेकडे असून त्यांनी ही जागा भाजपला देऊ केलेली आहे.
कारण भाजपचे राहुल नार्वेकर त्या मतदारसंघात तयारी करत असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी गेल्या १५ दिवसांमध्ये भूमिपूजनाचे कार्यक्रम पार पाडले आहेत. तर शिर्डीच्या जागेसाठी मनसे इच्छूक असून भाजपने या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास मनसे महायुतीत सामील होणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.