व्हिडिओ

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सुरक्षा वाढवली; आरक्षणाबाबतच्या वक्तव्यानंतर सुरक्षा वाढवली

Published by : Dhanshree Shintre

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवली आहे. आरक्षणाबाबतच्या वक्तव्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आरक्षणाबाबत वक्तव्य केल्यानंतर तणाव पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज ठाकरे लातूर शासकीय निवासस्थानी मुक्कामी आहे. तर राज ठाकरे यांना भेटणाऱ्यांना तपासणी करुन त्यांना विश्रामगृहात प्रवेश दिला जातो.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. कारण मनसे स्वबळावर निवडणूक लढणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे. मात्र याचवेळी त्यांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं आपल्या राज्यात आरक्षणाची गरजच नाही असं ते म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे. ज्याठिकाणी धाराशिवमध्ये राज ठाकरे होते त्याठिकाणी राडा झाल्याचा पाहायला मिळालं होतं त्याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड