मनसे नेते अविनाश जाधवांसह 11 मनसे कार्यकर्त्यांची अखेर जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. या सर्वांनी मुलुंड आनंदनगर टोल नाक्यावर राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आंदोलन केले होते त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलेलं. ज्यावेळी या सर्वांना अटक केल्याची बातमी पसरली त्यावेळी मनसे कार्यकर्ते हे मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. सर्वांची मुक्तता करण्यासाठी मनसैनिक पोलीस ठाण्यात ठाण मांडून होती अखेर रात्री उशिरा या सर्वांचा जामीन मंजूर करण्यात आलाय.