भिवंडी शहरात दिवसभर सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी आता जोरदार लागली आहे. 24 तासात झालेल्या दोन दुर्घटनांमध्ये 2 जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिक संतप्त झाले आहेत. अवजड वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोकोचा इशारा आमदार रईस शेख यांनी दिला.