मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, 2 महिन्यांनी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे काही नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेचं भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेचं भांडवल करून सत्तेचं स्वप्न पाहिलं जातंय. माननीय मोदीजींनी पंतप्रधान म्हणून या घटनेच्या संदर्भात माफी मागितली. असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.