राज्याचे मंत्री गुलाबराव पाटलांना अजूनही सरपंचपदाचा मोह असल्याचं समोर आलं आहे. जळगावमध्ये त्यांनी त्याबाबत खंतही व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यातील सुभाष वाडी ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात सरपंचपदाच्या खुर्चीवर बसण्याचा आपल्यालाही हेवा वाटत असल्याचे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. सरपंच नसल्यामुळे त्या खुर्चीवर बसलो नाही मात्र सरपंचांना खुर्चीवर बसून मी फोटो काढला असून गुलाब बाबा नावाच्या एका साधूसोबत आपण फोटो काढल्याची सरपंचांना आठवण राहील, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी स्वतःच्या नावाचा साधू गुलाब बाबा म्हणून उल्लेख केला आहे.