पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मास्टरमाईंड संदीप धुनियाच्या प्रेयसीचा ड्रग्ज तस्करी प्रकरणात समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. संदीपची प्रेयसी सोनम पंडितची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. संदीपने सोनमच्या नावाने काही मोबाईल सीमकार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. संदीप आणि सोनम यांनी पुण्यात भाडेतत्त्वावर एक फ्लॅट घेतल्याची माहिती आहे. संदीपची प्रेयसी सोनम पंडित हिला पुणे पोलिसांनी बिहार मधील पूर्णियातून जाऊन नोटीस दिली होती. ड्रग्स तस्करी प्रकरणात मुख्य सूत्रधार संदीप धुनिया हा नेपाळमार्गे कुवेतला पसार झाल्याची शक्यता आहे.